Women’s Day Celebration

माहेरवाशीण महोत्सव

८ मार्च २०२२ रोजी साजरा केला गेला आपल्या मनमुक्तांगणमद्ये

या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता येथे येणाऱ्या प्रत्येक स्त्री ने काही तर मोलाचे मार्गदर्शन घेऊन जावे आणि आपल्या आयुष्यात काही तर नवीन करावं आणि त्याचे मार्गदर्शन दुसऱ्यांनी त्यांच्याकडून घ्यावे आणि ही साखळी अशीच चालू राहावी .

या कार्यक्रमाची सुरुवात सगळ्या लेकींना ओवाळून केली गेली मग सगळ्यांनी न्याहारी केली मग मनमुक्तांगण फिरून पाहिले.

– कार्यक्रमाची सगळी सोय ही हवेशीर आंब्याच्या बागेत केली होती.

– सगळे फिरून आले मग मस्त बाजल्यांवर, खुर्च्यांत बसले आणि ठरल्याप्रमाणे महोत्सव सुरू झाला.

– सुरुवातीला काही स्त्रियांनी त्यांची आवड सादर केली कोणी गाणं म्हंटला कोणी चालू असलेला आयुष्य सांगितला.

– अश्विनी धुप्पे मॅडम ह्या कार्यक्रमाच्या अतिथी होत्या त्या समाज सेविका आहेत, सेवा फाऊंडेशन मद्ये अनेक स्त्रियांना त्यांचा मान मिळवून देण्याचा काम करतात एवढच नव्हे तर प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर कसा उभा राहायचा आणि येणाऱ्या संकटांना कसं सामोरं जायचं याचा अगदी रोखटोक बोलणं होतं. तब्बल १ ते १.५ तास त्यांचा संभाषण चालू होता.

– या नंतर सगळ्यांना आपल्यात असलेला लहान मुल बाहेर काढायची संधी दिली आणि संगीत खुर्ची खेळलो . ते झाल्यावर सगळ्यांनी मनमुराद असा डांस केला .

–  दुपारी मस्त पुरण पोळीचा बेत होता त्याचा आस्वाद घेतला आणि थोडा वेळ आराम करून फॅशन शो साठी तयार झाले . retro look थिम होती.

– सगळे अगदी जुन्या काळातील नटी बनल्या होत्या एवढ्या सुंदर नटल्या होत्या.

या कार्यक्रमात सुध्दा आपण फॅशन च ज्ञान असलेल्या २ पाहुणे कलाकारांना बोलावले होते .

  • आरती भास्कर पानसरे २. स्नेहा गावडे कोकणे

मस्त असा फॅशन शो झाला सगळ्यांनी खूप धमाल केली फोटो काढले.

आणि फोटो काढण्यासाठी एक मस्त जागा केली होती, बांबूच्या घरासमोर जिकडे जात ठेवला होता फुलांनी सजवलेला.

काही पाट्या बनवल्या होत्या त्या हातात घेऊन फोटो काढले गेले.

एक फ्रेम बनवली होती ती घेऊन फोटो काढले गेले.

हे सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यात बॉलिवूड फोटोग्राफर मनीष नारकर यांनी घेतले.

घरी जाताना आपल्या लेकीला आठवण म्हणून एक भेट वस्तू देण्यात आली, सगळ्यांनी हसमुख आनंदाने निरोप घेतला .

 

स्त्रित्वाचा उत्सव,

माहेरवाशीण महोत्सव साजरा करणे सुंदर आहे मज्जाच मज्जा !

 

आयुष्य सुंदर आहे मज्जा च मज्जा.

 

मनमुक्त फाउंडेशन

मनमुक्तांगण

जशी दृष्टी तशी सृष्टी

व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा  !

जीवन एक उत्सव!!

मज्जाच मज्जा!