आयुष्याच्या एका वळणावर डॉ. नामदेव भोसले देवदूत बनून भेटले. त्यांच्यासोबत पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा, ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशन व मनमुक्त फाउंडेशन मध्ये काम करण्याचं भाग्य लाभलं. या विश्वातील हरित वसुंधरेला हिरवा शालू नेसवण्यासाठी निसर्ग देवतेने दिलेले जणू काही निमंत्रणच होत. इथेच मला माझ्या जीवनाचा मूलमंत्र सापडला व यापुढील आयुष्य आनंदाने, स्वयंस्फूर्तीने, प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने जगण्यासाठी मुख्यजीविका मिळाली. पंचतत्वात विलीन होण्यापूर्वी पंचमहाभूतांचे रक्षण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. हे सर्व करायच असेल तर आपली मानव रुपी इमारत भक्कम असायला हवी. या हेतूने शरीर हे भगवंत आहे. या उक्तीनुसार या भगवंताची पूजा करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून विश्वाची सेवा करण्यासाठीं सुदृढ होण्यास प्रवृत्त केले. अशाप्रकारे
मनमुक्त ने माझं आयुष्यच बदलून टाकलं.
मनमुक्त फाउंडेशन सुंदर आहे
मज्जाच मज्जा🌱🌱
आयुष्य सुंदर आहे
मज्जाच मज्जा 🌹🌹