Rice Harvest and Life Enjoyment Festival

भात कापणी आणि आयुष्यानंद महोत्सव (Rice harvest and life enjoyment Festival)

मनमुक्तांगण आणि मनमुक्त फाउंडेशन आयोजित भात कापणी शेती आणि आयुष्यानंद महोत्सव हा दोन दिवसांचा शेतीच्या मैदानावर शेतकरी च्या भूमिकेत उभा राहून आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा याची अनुभूती देणारा आणि आयुष्य सुंदर आहे मज्जाच मज्जा करत जीवन जगण्याचा महोत्सव साजरा करण्यात आला, तसेच सोबत आमराई मध्ये बसून जेवण्याचा आनंद, पाण्याच्या कुंडामध्ये पोहणे झाडाचे पेरू तोडून खाणे, नदीमध्ये मस्त जाऊन उड्या मारणे, सरसगड तैल-बैला यांच विहंगम दृश्य येथून पाहण्याचा आनंद मिळाला, शेतीमधील इतर कामे ट्रॅक्टर चालवणे कुत्रे मांजर ससे इतर पक्षी यांच्यासोबत खेळण्याचा आनंद अशा बऱ्याच गोष्टींचा मनमुराद आनंद समाधान आपल्याला अनुभव मिळाला, तसेच मनिषा’s किचन च्या जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यात आला

आयोजक

मनमुक्त फाउंडेशन

दि. ३०,ऑक्टोंबर २०२१