विश्वाच्या कल्याणासाठी, जनसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी, सर्वांचे आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी, प्रत्येकाच्या आयुष्यातील अपूर्ण व भंग पावलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, भूतलावरील सर्वांचे आयुष्य हसतखेळत जगण्यासाठी, लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा हे ब्रीद वाक्य सर्वांच्या अंतर्मनात फुलवून मानवतेला प्रथम प्राधान्य देण्यात सदैव तत्पर असणाऱ्या मनमुक्त फाउंडेशन संस्थेतर्फे आणि ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशन च्या सहकार्याने पहिलं आरोग्य शिबीर (मेडिकल कँप) दिनांक ६ ऑगस्ट २०२१ रोजी सिद्धेश्वर बुद्रुक, सुधागड-पाली (रायगड), रा.जि.प. शाळा सिद्धेश्वर येथे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरात सिध्देश्वर व परिसरातील २०० हून अधिक स्त्री पुरुषाचे खालील प्रमाणे मेडिकल चेकअप करण्यात आले व त्यांना आरोग्यासाठी जरुरीचे साहित्य किट रुपात देण्यात आले.
1. जनरल हेल्थ चेक अप
2. बोन डेनसिटी टेस्ट
3. मासिक पाळी दरम्यान महिलांच्या स्वच्छतेबाबत जागरूकता
4. सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप
5. ओरल हेल्थ (Oral Health) आणि डेंटल किट चे वितरण
या आरोग्य शिबीर (मेडिकल कॅम्प) मध्ये खालील उपस्थित डॉक्टर्सनी वेगवेगळ्या विभागात तपासणी केली. :
जनरल हेल्थ आणि आहार विषयक सल्ला आणि मार्गदर्शन
डॉ. योगिता गोर्डे
डॉ. राहुल गोर्डे
स्त्रीरोग चिकित्सा आणि मार्गदर्शन
डॉ अश्विनी गेठे
डॉ. अजित गेठे
दंतरोग चिकित्सा आणि मार्गदर्शन
डॉ. महेश गोसावी
डॉ ओम सुरेश लडके
डॉ. अपूर्वा कुऱ्हाडे
डॉ. जय माने
डॉ. श्वेता यादव
मनमुक्त फौंडेशनतर्फे घेण्यात आलेला हा पहिलाच मेडिकल कॅम्प अतिशय वेगळा असून त्यात येणाऱ्या प्रत्त्येक व्यक्ती हा अतिशय समाधानपूर्वक व चेहऱ्यावर अनोखं हसू घेऊन परतत होता. या कॅम्प मध्ये समाविष्ट प्रत्येक व्यक्ती “आयुष्य सुंदर आहे मज्जा च मज्जा” असा
नारा लगावत होता.
“व्यक्त व्हा रिक्त व्हा मुक्त व्हा” अशी टॅगलाईन असलेली ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशन व मनमुक्त फाउंडेशन ही संस्था यापुढे अशीच अनेक सामाजिक बांधिलकी जपणारी व लोक कल्याणासाठी कामे करत राहील. याची ही पहिली पायरी होती.
आयुष्य सुंदर आहे मज्जाच मज्जा! ❤️❤️
लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा ❤️❤️❤️❤️