“ आयुष्य म्हणजे मज्जाच मज्जा ” ही एक“संस्कृती”आहे आणि“ व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ”हे एक विश्वातील सर्व सजीव निर्जीवां साठींचे संस्कार पीठ आहे.
जगातील प्रत्येकाचे आयुष्य आनंदी व्हावे व आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर यश मिळावे. प्रत्येकाला मनशांती मिळावी, प्रत्येक व्यक्तीच्या मनातील सर्व विचारांना व्यक्त होण्यासाठी हे मुक्त विद्यापीठ “व्यासपीठ” म्हणून कार्य करत आहे.
प्रत्येकाने आपल्याला मिळालेले एकमेव आयुष्य आनंदाने जगावे आणि या आनंदाचा मार्ग त्याला स्वतः मध्येच सापडतो. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावायला लावणारे विचार या विद्यापीठात आत्मसात करून घेतले जातात व त्यांचे आयुष्य पुनर्निर्माण केले जात आहे.
स्वतः तून नात्यात , नात्यातून कुटुंबात, कुटुंबातून संस्थेकडे, संस्थेकडुन समाजाकडे आणि समाजातून जगाकडे बघण्याचा सकारात्मक, कृतिशील, माणुसकीचा विचार म्हणजेच हे संस्कार पीठ आहे. पंचशील, पंचइंद्रिये,पंचसूत्री वापरून पंचमहाभूतांच्या ऋणातून प्रत्यक्ष कृती करून मुक्त होणे. तसेच प्रत्येक व्यक्तीला नवचैतन्य व निरागसता मिळवून देणे. हे ह्या विद्यापीठाचा उद्देश आहे.
या व्यासपीठा मध्ये मंथन सतत चालू आहे. या मंथनातून जे “अमृत “ आपणा सर्वाना मिळाले आहे तेच इतरांनाही वाटायचे आहे. त्यासाठी हा आपण आपल्यासाठीच प्रपंच आरंभलेला आहे. पंचमहाभूता प्रती कृतज्ञता मानून जीवनाचा महोत्सव साजरा करण्याची विवेकवादी व विज्ञानवादी परंपरा तयार करूयात.
“जशी दृष्टी तशी सृष्टी” याचा “भाव” सतत लक्षात घेऊन मनाच्या सामर्थ्याने व्यक्त होऊ, रीक्त होऊ, मुक्त होऊ या !
ही प्रस्तावना या क्षणापासून आम्ही संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरिता अंगीकृत व स्वतःप्रती अर्पण करत आहोत.
व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ मनमुक्त फाउंडेशन, रायगड.
मानवता प्रथम !
“Life is beutiful” is a “culture” and ” The University of Self Expression” is a culture for all living and non-living things in the Universe.
May everyone in the world have a happy life and success on all fronts. This Open University of Self Expression is acting as a “platform” for everyone to have peace of mind, to express all their thoughts.
Everyone should live happily with the only life we have, and he finds the path to happiness in himself. Therefore, the ideas that make everyone look inside themselves are assimilated in this university and their lives are being rebuilt.
It is a positive, creative, humane way of looking at oneself, from relationship to family, from family to organization, from organization to society and from society to the world. Using Panchsheel, Panchaindriye, Panchasutri to get rid of the debt of Panchmahabhuta by direct action. Also to give rejuvenation and innocence to every person. This is the purpose of this university.
The churning is constantly going on in this platform. The “nectar” that we have all got from this churning is what others want to feel. That is why we have started this world for ourselves. Let’s create a rationalist and scientific tradition of celebrating the festival of life with gratitude towards Panchmahabhuta.
Let us express ourselves with the power of the mind, become empty, become free by constantly remembering the “feeling” of “Creation as it is seen”!
From this moment on, we are embracing and dedicating ourselves to the welfare of the entire universe.
Manmukta Foundation, Raigad.
Humanity first!